Top image
Home
Search VSI
   

About VSI

Genesis

Mission

Achievements

Management

Infrastructure

Human Resource Development
Mass Communication
Recognition

Collaborations

Products

Services Offered

Publications

Area of Technologies

Technical Departments

Agronomy

Farm Development and Management

Sugarcane Breeding

Agricultural Economics

Agricultural Engineering

Agricultural Microbiology

Entomology

Molecular Biology & Genetic Engineering

Plant Pathology

Soil Science

Tissue Culture

Alcohol Technology

Environmental Sciences

Electronics & Computers

Sugar Instrumentation

Sugar Engineering

Sugar Technology

VSI Annual Report

por

VSI Bulletin

Contact Editor

Sugar Statistics

Finance

Other Sugar Sites

.

Return to Top

ऊस शेती [मराठी]


 

महासंचालकांचे संपादकीय

महाराष्ट्रामध्ये ८.०० ते ८.५० लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस हे नगदी पीक घेतले जाते. केंद्र शासनाने २२ ऑक्टोबर २००९ रोजी ऊसदर नियंत्रण कायद्यात दुरूस्ती करून वैधानिक किमान किंमत रद्द करुन त्याऐवजी रास्त आणि किफायतशीर किंमत (एफ.आर.पी.) घोषित केली. या नवीन धोरणानुसार सन २००९-१० मध्ये ऊसाला रास्त आणि किफायतशीर किंमत रु. १२९८.४० प्रतिटन ९.५०% मूलभूत साखर उताऱ्यासाठी आणि पुढील वाढीव १% साखर उताऱ्याला प्रतिटन रु. १३७ वाढीव दर जाहिर करण्यात आला.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कृषि विभागामार्फत प्रत्येक साखर कारखान्यांसाठी ऊस जात व हंगाम नियोजनाचा कार्यक्रम तयार करुन दिला जातो. त्या कार्यक्रमाची काटेकोरपणे अंमलबजावणी जे कारखाने करतात त्यांच्या सरासरी साखर उताऱ्यात लक्षणीय वाढ झाल्याचे आढळून आले आहे. दिलेल्या कार्यक्रमानुसार ऊस जातींची योग्य वेळी लागवड करणे आणि त्यांची योग्य वेळी तोडणी करुन गाळप करणे अत्यंत आवश्यक आहे. या मध्येही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सहभाग असणे अतिशय महत्वाचे आहे.
शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रातून जास्त साखर उतारा असणाऱ्या ऊस जातींची लागवड करुन या नियोजनामध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून या संस्थेने तयार केलेल्या व्हीएसआय ४३४ आणि को-व्हीएसआय ९८०५ या जातींचा जात आणि हंगाम नियोजनात अंतर्भाव करणे मह्त्वाचे आहे. या दोन्ही जाती पूर्व प्रसारित करण्यात आल्या असून त्यांच्या निरनिराळ्या कारखान्यांवर गाळप चाचण्याही घेण्यात आल्या आहेत. व्हीएसआय ४३४ ही सर्वात लवकर जास्त उतारा देणारी, दहाव्या महिन्यापासून सोळाव्या महिन्यापर्यंत साखर उतारा टिकवून ठेवणारी आणि पाण्याचा ताण को-७४० पेक्षाही जास्त सहन करण्याची क्षमता असलेली जात उती संवर्धन तंत्राचा उपयोग करुन निर्माण करण्यात आली आहे. या जातीच्या आठ कारखान्यांवर गाळप चाचण्या घेण्यात आल्या आणि प्रत्येक ठिकाणी प्रचलित जातीपेक्षा साखर उतारा एक ते दीड एककने जास्त मिळाला. याशिवाय सदरील जात गूळ तयार करण्यासाठीही उत्तम असल्याचे प्राथमिक अहवाल मिळाले आहेत. को-व्हीएसआय ९८०५ ही मध्यम उशीरा तयार होणारी व ऊसाचे उत्पादन जास्त देणारी, न लोळणारी जात आहे. राजारामबापू स.सा.का. येथे घेतलेल्या या जातीच्या गाळप चाचणीवरुन असे दिसून आले आहे कि को-व्हीएसआय ९८०५ ही जात गाळपास घेतली असता को-८६०३२ पेक्षा ०.६१ एककने जास्त साखर उतारा मिळतो. या जाती शेतकऱ्यांनी लावल्यास शेतकऱ्यांना आणि कारखान्यांना किफायतशीर ठरतील असा मला विश्वास वाटतो.
महाराष्ट्र राज्य साखर उताऱ्यात अग्रेसर असले तरी त्याचे प्रति हेक्टरी ऊस उत्पादन घटले आहे. यासाठी जी अनेक कारणे आहेत त्यापैकी महत्वाची कारणे म्हणजे त्याच त्या बेण्याचा ऊस लागवडीसाठी वर्षानुवर्षे उपयोग करणे, ऊसाच्या खोडवा पिकाची नीट काळजी न घेणे, पाण्याचा अति वापर करणे, कीड व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी योग्य ते उपाय वेळेवर न करणे, पूर्व व आंतर मशागत नीट न करणे, खत आणि पाणी यांचे योग्य नियोजन न करणे इत्यादि, चांगल्या बेण्यासाठी उती संवर्धित ऊस रोपांचा वापर कसा करावा, खोडवा पिकाची काळजी कशी घ्यावी, पाण्याचा योग्य वापर कसा करावा, औजारांच्या सहाय्याने पूर्व मशागत आणि ऊस पिकातील आंतर मशागत कशी करावी, रोग व किडींचे नियंत्रण कसे करावे या सर्व गोष्टींचा उहापोह सदरील ज्ञानयाग पुस्तिकेत केला आहे. या गोष्टींचा शेतकऱ्यांनी अवलंब केल्यास ऊस उत्पादन व साखर उताऱ्यात लक्षणीय वाढ करता येईल. हि काळाची गरज आहे.
या सुधारीत तंत्राचा वापर करुन दर हेक्टरी ऊस व साखर उत्पादनात वाढ करण्याचे प्रयत्न ऊस उत्पादक शेतकरी करतील आणि त्यामुळे महाराष्ट्र ऊस आणि साखर उत्पादनात प्रथेम क्रमांकावर परत येईल याबद्दल मला खात्री वाटते.

शिवाजीराव देशमुख
महासंचालक


Useful Information

Oos-sheti (Marathi)

Downloads

Location Map

Member Sugar Factories

Photo Gallery

Organization Structure

Library

Conference/ Workshops / Seminars

Events

Paper Publications

 

.

Studying at VSI

Admissions

Academic Calender

Academic Procedure

Post Graduate Diploma & Certificate Courses

Short Term Training Programs

Foreign Students Special Courses

Courses Content

Academic Results

Training Quality

Hostel Arrangement

Alumni

VSI Awards

VSI Awards

.

.

Research & Development

Sugarcane Varieties

Sugarcane Diseases

Sugarcane Pests

.

.

.

.

.

Best viewed in Internet Explorer 6.0 or higher at 800x600 on the Windows platform