१. दोनडोळा टिपरीचे बेणे घेऊन जाणेसाठी दोन दिवस अगोदर रक्कम जमा करावी. |
२. सरासरी डोळ्यांच्या संख्येनुसार दहा उसाच्या मोळ्या बांधून वाढे व पाचटासह बेणेपुरवठा केला जातो. |
३. बेणे तोडण्यासाठी स्वताःचे मजूर आणल्यास मोळी मागे रु.१५ कमी होतील. |
४. बेणे नेण्यासाठी गाडी ही बिगर हुडाची,डांब व रस्सीसह पाठवावी. |
५. गाडीच्या बाजूचे फाळके जास्त उंच असल्यास गाडीत बेणे भरणेसाठी ज्यादा मोबदला द्यावा लागेल. |
६. काही नैसर्गिक व अपरिहार्य कारणांमुळे बेणे त्यादिवशी देता आले नाही तर त्याची जबाबदारी संस्थेवर राहणार नाही. |
७. एक डोळा रोपे घ्यावयाची असल्यास ३० ते ४५ दिवस अगोदर ५० टक्के रक्कम जमा करून रोपे बुक करता येतील. |
८. रोपे उचल केली नाही तर, भरलेली ५० टक्के रक्कम परत मिळणार नाही, याची नोंद घ्यावी. |
९. काही नैसर्गिक अडचणीमुळे रोपे देण्यास विलंब होऊ शकतो. |
For New Registration